-
अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या ग्लॅमरस जीवनशैलीमुळेही चर्चेत राहतात. बऱ्याच क्रिकेटपटूंकडे आलिशान घरं, महागडे कपडे आणि महागड्या कारही आहेत.
-
आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना केवळ महागड्या कारचा छंद नाही तर त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनीसारखी आलिशान कारही आहे.
-
युवराज सिंगकडे लॅम्बोर्गिनी मर्सीएलेगो एलपी ६४०-४ आहे, ज्याची किंमत सुमारे तीन कोटी इतकी रुपये आहे. (स्रोत: @yuvisofficial/instagram)
-
केएल राहुलकडे लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर कार आहे, ज्याची किंमत सुमारे ४ कोटी १० लाख इतकी आहे. (स्रोत: @klrahul/instagram)
-
सचिन तेंडुलरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी उरूस देखील आहे. ज्याची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. (स्रोत: @sachintendulkar/instagram)
-
हार्दिक पांड्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी हुराकन इव्हो सारखी कार समाविष्ट आहे, ज्याची किंमत ३.२२ कोटी ते ४.९९ कोटी रुपये आहे. (स्रोत: @hardikpandya93/instagram)
-
रोहित शर्माने गेल्या वर्षीच लॅम्बोर्गिनी उरूस खरेदी केली होती, ज्याची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी आहे. (स्रोत: @rohitsharma45/instagram)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”