-
Sachin Pilot Divorce: काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांची पत्नी सारा अब्दुल्ला हिला घटस्फोट दिला आहे. २००४ मध्ये सचिन आणि सारा यांचे लग्न झाले होते. सारा अब्दुल्ला ही जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची मुलगी आणि उमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. (फोटो: @rajesh07inc/twitter)
-
सचिन पायलट यांनी दोन दिवसांपूर्वी (३१ ऑक्टोबर) राजस्थानच्या टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून घटस्फोटाबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी स्वतःला घटस्फोटित घोषित केलं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या नावासमोर घटस्फोटित असं लिहिलं आहे. सचिन आणि सारा यांना आरन आणि विहान अशी दोन मुलं आहेत. (फोटो – जनसत्ता)
-
या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेच्या योगी आदित्यनाथ सरकारमधील परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांचा घटस्फोट झाला. त्यांची पत्नी आणि माजी मंत्री स्वाती सिंह यांनी घटस्फोट घेऊन त्यांचे २२ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले. (फोटो: सोशल मीडिया)
-
घटस्फोटावर दयाशंकर सिंह म्हणाले होते की, हा घटस्फोट त्यांच्या इच्छेविरुद्ध झाला आहे. (फोटो: सोशल मीडिया)
-
भाजपा खासदार मनोज तिवारी यांचाही घटस्फोटही यंदा चर्चेत होता. मनोज तिवारी यांनी सांगितले होते की, मला कधीही घटस्फोट नको होता. मनोज तिवारींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पत्नी राणी तिवारी यांना घटस्फोट घेऊ नये म्हणून समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. (फोटो: सोशल मीडिया)
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही घटस्फोटाचा त्रास सहन करावा लागला आहे. घटस्फोटानंतर मान यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती की, जनतेची सेवा करण्यासाठी आपण वैवाहिक जीवनापासून वेगळे झालो आहोत, असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. (फोटो: पीटीआय)
-
टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांचा घटस्फोटही चर्चेत होता. नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन यांच्याशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर चार वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. (फोटो: नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)
-
नुसरत जहाँ यांनी म्हटलं की, त्यांच्या घटस्फोटाची बातमी तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे. कारण, आमचं लग्नच कायदेशीर नव्हतं. (फोटो: पीटीआय)
-
बिजू जनता दलचे खासदार अनुभव मोहांती यांनी त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. दोघांचे घटस्फोट प्रकरण अनेक महिन्यांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर खासदाराने दोन वर्षांपासून पत्नीशी शारीरिक संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते मानसिक तणावात आहेत, असं त्यांनी सांगितलं. या परिस्थितीमुळेच त्यांना घटस्फोट हवा आहे. (फोटो: अनुभव मोहांती फेसबूक)
-
न्यायालयाने प्रियदर्शनी यांना अनुभव यांचे घर सोडण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अनुभव यांना त्यांच्या पत्नीला दरमहा ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. (फोटो – जनसत्ता)

Anaya Bangar: लिंगबदल केल्यानंतर क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीचा धक्कादायक दावा; अनाया बांगर म्हणाली, “क्रिकेटपटू मला नग्न फोटो…”