दागिने, गॉगल घालून मराठा आरक्षणासाठी मराठी कलाकारांचे आंदोलन; पुण्यातील फोटो चर्चेत, नवीन अपडेट काय?
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय साखळी उपोषण असे बॅनर लावून ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असे फलक झळकावत पुण्यात मराठी कलाकारांनी आंदोलन सुरु केले आहे.
मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)सर्वपक्षीय बैठकीनंतर विनंती करूनही मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्यासाठी तयार नाहीत. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिली होती. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वाचे एकमत आहे. त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते. मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे’’ असे बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याचे शिंदेंनी सांगितले होते.(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आज पुण्यात सुद्धा खास आंदोलन करण्यात आले होते (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)मराठी कलाकारांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात एकत्र येऊन आंदोलन केले होते (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)यावेळी कलाकारांनी केलेला पोशाख विशेष लक्षवेधी ठरला. महिलांनी यावेळी नऊवारी नेसून, कपाळाला चंद्रकोर लावून तसेच फेटे बांधून आरक्षण मागणाऱ्या घोषणा दिल्या होत्या. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)तर पुरुष आंदोलनकर्ते सुद्धा पारंपारिक पोशाखात घोषणा देताना दिसत आहेत. यावेळेस आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा, “एकच मिशन, मराठा आरक्षण” असं लिहिलेले फलक हातात धरले होते. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन आता तीव्र होत चालले आहे. आतापर्यंत ११५ ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या हिंसाचारात १००-१५० पोलीस जखमी झाले आहेत. तसेच ३० ते ४० नागरिकही जखमी झाले असून आरक्षणासाठी आतापर्यंत विविध ठिकाणी १५ आत्महत्याचे प्रकार घडल्याचे समजते.(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)