-
कार खरेदी करणे हे सामान्य माणसाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष ते घालवतात. मगं कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होते.
-
एक-एक पैसा जमवून लोकं आपली स्वतःची कार खरेदी करतात. परंतु विचार करा तुमची प्रिय कार चोरीला गेली तर..?
-
आपल्या देशात दररोज कित्येक वाहनं चोरीला जातात. मात्र, अशा घटनेमुळे व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान होते.
-
एका अहवालानुसार, भारतातील एकूण वाहन चोरीपैकी ५६ टक्क्यांहून अधिक चोरी दिल्ली-एनसीआरमध्ये होते.
-
धक्कादायक बाब म्हणजे, देशात दरवर्षी १ लाखाहून अधिक वाहने चोरीला जातात. खरंतर ज्या कारला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असते, अशा कार चोरीला जात आहेत.
-
कोणत्या कारची भारतात सर्वाधिक चोरी होते, तुम्हाला माहिती आहे का..? एका रिपोर्टमध्ये पाच कारची नावे सांगितली आहेत. पाहा तुमची कार आहे का यात…
-
Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट भारतातील सर्वाधिक चोरीला जाणारी कार म्हणून अव्वल स्थानावर आहे. ही ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीची कार आहे.
-
Maruti Suzuki Wagon R: कार चोरीच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआरचाही समावेश आहे. चोरी होणाऱ्या कारच्या यादीत ही कार दुसऱ्या स्थानावर आहे.
-
Hyundai Creta: भारतात सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV पैकी ह्युंदाई क्रेटा एक आहे. देशातील तिसरे सर्वात जास्त चोरीला जाणारे हे वाहन आहे.
-
Hyundai Santro: या यादीतील आणखी एक Hyundai मॉडेल Hyundai Santro आहे. या कारचीही चोरी मोठ्या प्रमाणात होते.
-
Honda City: Honda City या यादीत पाचव्या स्थानवर असून ही कारही मोठ्या प्रमाणात चोरीला जाते. या कारची विक्रीही देशात चांगली होते.
-
सध्या गाड्या चोरी होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक लोक गाड्या अनोळखी ठिकाणी पार्क करतात, ज्यामुळे गाड्या चोरीला जातात. दिल्ली-एनसीआरमध्ये कार चोरीचा सर्वाधिक धोका आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती