-
देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. आज म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. हवा केवळ विषारीच नाही तर प्राणघातकही झाली आहे. (पीटीआय फोटो)
-
त्यामुळे हे प्रदूषण आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. या फोटोंमध्ये प्रदूषणामुळे दिल्लीत धुके पसरल्याचे पाहायला मिळत आहे. (पीटीआय फोटो)
-
प्रदूषणामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांचे प्राथमिक वर्ग पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. (पीटीआय फोटो)
-
याशिवाय, दिल्ली सरकारने दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्ये अनावश्यक बांधकामांसह बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल कार चालविण्यावर बंदी घातली आहे. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीतील अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक AQI ४०० च्या पुढे गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, हवेच्या गुणवत्तेची ही पातळी गंभीर श्रेणीमध्ये असल्याचे मानले जात आहे. (पीटीआय फोटो)
-
नोएडाबद्दल सांगायचे झाले तर येथील AQI देखील ४०० च्या पुढे आहे. सेक्टर ६२ चा AQI ४८३ आहे, सेक्टर १ चा ४१२ आहे आणि सेक्टर ११६ चा ४१५ आहे जो अत्यंत गंभीर श्रेणीत येतो. (पीटीआय फोटो)
-
एकीकडे गाझियाबादमध्ये हा आकडा ५७२ वर गेला आहे, तर दुसरीकडे आनंद विहारमध्ये AQI ९९९वर पोहोचला आहे. (पीटीआय फोटो)
-
हवामान खात्याने म्हटले आहे की, “प्रदूषणामुळे राजधानीत पुढील तीन दिवस हलके धुके राहण्याची शक्यता आहे. (पीटीआय फोटो)
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो