-
अलीकडेच एडलगिव हुरुन इंडिया तर्फे भारतातील दानशूरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील अनेक व्यावसायिकांची नावे समाविष्ट आहेत. या यादीत गौतम अदाणी, मुकेश अंबानींना मागे टाकून HCL चे मालक दानशूरांच्या यादीत पुढे गेले आहेत. आज आपण देशातील सात टॉप दानशूरांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी या वर्षात सर्वाधिक दान केले आहे. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
दानशूरांच्या यादीत पहिले स्थान HCL टेक्नॉलॉजीचे संस्थापक व प्रमुख शिव नादार यांचे आहे. नादार व कुटुंबाने या २०२३ वर्षात २०४२ कोटींचे दान केले आहे (फोटो सौजन्य: Indian Express)
-
दुसऱ्या स्थानी Wipro चे मालक अजीम प्रेमजी व कुटुंब आहेत. या कुटुंबाने वर्षभरात १७७४ कोटी रुपयांचे दान केले आहे. (फोटो सौजन्य: Indian Express)
-
तिसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी व कुटुंबियांचे नाव आहे. अंबानी परिवाराने २०२३ च्या वर्षात ३७६ कोटी रुपये दान केले आहेत.(फोटो सौजन्य: Indian Express)
-
चौथ्या क्रमांकावर आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगल बिर्ला व कुटुंबियांचे नाव आहे. या वर्षात त्यांनी २८७ कोटी रुपयांचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)
-
पाचव्या क्रमांकावर गौतम अदाणी यांचे नाव आहे. ज्यांनी २०२३ मध्ये २८५ कोटी रुपयांचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)
-
सहाव्या क्रमांकावर बजाज ग्रुपचे नाव आहे. या वर्षात बजाजतर्फे २६४ कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)
-
सातव्या क्रमांकावर वेदांता ग्रुपचे चेअरमॅन अनिल अग्रवाल आहेत. अग्रवाल कुटुंबाने या २०२३ वर्षात २४१ कोटींचे दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)
-
इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी हे आठव्या व दहाव्या स्थानावर आहेत. त्यांनी अनुक्रमे 189 कोटी आणि 170 कोटी दान केले आहे.(फोटो सौजन्य: Indian Express)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन