-
‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव सध्या अडचणीत आला आहे. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी वनविभागासह छापा टाकून ९ सापांसह ५ जणांना अटक केली. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
खरं तर, औषधांमध्ये सापाचे विष वापरतात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, ज्या सापाच्या दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृ्त्यू होतो, त्या विषाचा वापर लोक नशेसाठी कसा करु शकतात?
-
आम्ही तुम्हाला सांगतो, सापाचे विष केवळ नशेसाठीच नव्हे तर औषधांमध्येही वापरले जाते. वेदना कमी करणार्या औषधांसह अनेक रोग बरे करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.
-
अशातच लोकांनी सापाच्या विषाचा वापर हळूहळू नशा करण्यासाठी केला. सापाच्या विषामुळे होणारी नशा इतर नशेपेक्षा खूप वेगळी असते. त्याची नशा अल्कोहोल आणि ड्रग्सपेक्षा खूप वेगाने चढते शिवाय ती जास्त काळ टिकते. याच कारणामुळे सापांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते.
-
सापाच्या विषापासून नशा करणारे बहुतेक लोक मध्यम वर्गातील असतात, ज्यांना महागडी ड्रग्स खरेदी करणं परवडत नाहीत. यासाठी ते सर्पमित्रांकडे जातात आणि त्यांच्याकडून स्वस्तात विष विकत घेतात. तर या विषाची नशा करणारा दुसरा वर्ग श्रीमंत असतो जे रेव्ह पार्ट्यांमध्ये जाऊन नशा करतात.
-
तुमच्या माहितीसाठी, सापाच्या विषाच्या नशेचा इतिहास ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांहून अधिक जुना आहे. सापाच्या विषाचा वापर आचार्य चाणक्यांनी गुप्त साम्राज्यात मुलींना विष देऊन सुरू केला होता. या मुलींना लहानपणापासूनच सापाच्या विषाच्या संपर्कात आणले जायचे.
-
लहानपणापासूनच विषाचा सतत वापर केल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नव्हता. मात्र इतर कोणी या मुलींच्या जवळ येण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू व्हायचा. या मुलींचा नंतर शत्रूंना मारण्यासाठी वापर केला जात असे.
-
तसेच १४४५ मध्ये जन्मलेले गुजरातचे सहावे सुलतान महमूद बेगडा ‘विष पुरुष’ या नावाने प्रसिद्ध होते. ते इतके विषारी होते की, त्यांना डास चावला तर तो स्वतःच मरायचा. त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शत्रूंपासून वाचवण्यासाठी लहानपणापासूनच विष द्यायला सुरुवात केली होती, जेणेकरून त्यांना कोणी विषप्रयोग करुन मारू नये.
-
रेव्ह पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणार्या सापाच्या विषावर प्रक्रिया करून ते हलके केले जाते, ज्यामुळे नशा तर होतेच पण शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, दुसरी पद्धत अशी आहे की, एखादी व्यक्ती सापाला स्वतःला दंश करण्यास भाग पाडते. साप अशा प्रकारे पकडला जातो की तो शरीरात फारसे विष सोडत नाही. सतत विषाचे सेवन केल्याने व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, त्यामुळे सापाच्या विषाचा त्यांच्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
(Photos – Pexels )

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…