काही शहरे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही त्यांच्या सांस्कृतिक वारशासाठी जगात प्रसिद्ध आहेत. (फोटो – freepik)
तुम्ही भारताचा इतिहास वाचलात तर तुम्हाला हे देखील कळेल की भारतात दारु फार पूर्वीपासून बनते. भारतात एक शहर आहे, ज्याला भारताचं वाईन कॅपिटल देखील म्हणतात.(फोटो – freepik)
तुम्हाला या शहराबद्दल माहिती आहे का? भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख कोणत्या शहराला मिळाली आहे, याचं उत्तर जाणून घेऊयात.(फोटो – freepik)
आपल्याकडे मद्यप्रेमींची कमी नाही. अशातच महाराष्ट्रातील एका शहराला भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख मिळाली आहे. (फोटो – freepik)
महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक शहराला भारताची वाईन कॅपिटल म्हणजेच भारताची वाईन राजधानी म्हटले जाते. (फोटो – freepik)
लोक हे शहर नाशिक म्हणून कमी आणि भारताची वाईन कॅपिटल म्हणून जास्त ओळखतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात उत्पादित होणाऱ्या मद्याचा मोठा हिस्सा याच शहरात तयार होतो. (फोटो – freepik)
या एकट्या शहरात ५२ वाईन प्लॉट्स असून ते चालवण्यासाठी ८००० एकरमध्ये द्राक्षांची लागवड केली जाते. (फोटो – freepik)
आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सर्व प्रकारच्या द्राक्षांच्या बागा पाहिल्या तर त्याचे एकूण क्षेत्र सुमारे १८००० एकर आहे. (फोटो – freepik)
नाशिकची माती वेगळ्या प्रकारची आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लालसर रंगाची ही माती असून एका अहवालानुसार, एकट्या नाशिक शहरात दरवर्षी २० टनांहून अधिक द्राक्षांचे उत्पादन होते. (फोटो – freepik)