-
भारतीय रेल्वेन प्रवास करताना तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, ट्रेनच्या टॉललेटमधील मानवी विष्ठा कशी साफ केली जाते? किंवा ही विष्ठा नेमकी कुठे जाते? चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नाचे उत्तर..(प्रातिनिधिक फोटो – अनप्लॅश)
-
पूर्वी ट्रेनच्या टॉयलेटच्या खालील चेंबर्स ओपन होते. म्हणजेच टॉयलेट सीटचा कमोड ओपन होता. यामुळे एखाद्या प्रवाशाने टॉयलेटमध्ये लघवी किंवा विष्ठा केली तर ती थेट रुळांवर पडायची.(Photo-indianexpress)
-
यामुळे प्रवाशांनाही नेहमी ट्रेन चालू असताना टॉयलेटमध्ये जाण्याची सूचना केली जायची. जेणेकरून विष्ठा आणि लघवी रुळांवर विखुरली जाईल व रेल्वेस्थानक स्वच्छ राहतील.(प्रातिनिधीक फोटो)
-
आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत.जे डीआरडीओने तयार केले आहेत आणि त्यांच्याच मदतीने ते ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहेत.(Photo-freepik)
-
जेव्हा एखादा प्रवासी या टॉयलेटचा वापर करतो, तेव्हा त्याची विष्ठा एका चेंबरमध्ये पोहोचते, जिथे उपस्थित बॅक्टेरिया त्यांचे मुख्य काम करतात. हे बॅक्टेरिया विष्ठा पाण्यात रूपांतरित करतात.(प्रातिनिधीक फोटो)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच