-
रल्वे हे आपल्या देशात प्रवासाचे सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त साधन आहे. प्रवास छोटा असो वा लांब, लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते.
-
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी मानला जातो. त्यामुळेच दररोज कोट्यावधी लोकं भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात.
-
मात्र, ज्या रेल्वेतून तुम्ही दररोज स्वस्त दरात प्रवास करता त्या रेल्वेला बनवण्यासाठी किती पैसा खर्च किती खर्च येत असेल याची तुम्हाला काही कल्पना आहे का..? चला तर जाणून घेऊया…
-
रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे डबे असतात. यामध्ये जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोचचा समावेश आहे. साधारण कोच तयार करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येतो.
-
रिपोर्ट्सनुसार, स्लीपर कोच तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. तर एक एसी कोच तयार करण्यासाठी रेल्वेला २ कोटी रुपये खर्च करावे लागतात.
-
त्याचप्रमाणे २४ बोगी असलेली संपूर्ण ट्रेन तयार करण्यासाठी रेल्वेला सुमारे ६० ते ७० कोटी रुपये खर्च करावे लागतात, ही मोठी रक्कम आहे.
-
ट्रेनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, प्रत्येक ट्रेन बनवण्याची किंमत वेगवेगळी असते. MEMU २० कोचच्या जनरल टाईप ट्रेनची किंमत ३० कोटी रुपये आहे.
-
तर साधारण ट्रेन बनवण्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त ६० ते ७० कोटी रुपये खर्च करावे लागतात.
-
भारतातील सुमारे १८ मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत ११० ते १२० कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : indian express)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य