-
उत्तर प्रदेशातील अयोद्धेत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहेत. या मंदिराचे दिवस-रात्र काम सुरू आहे.
-
२२ जानेवारी, २०२४ रोजी या मंदिराचे लोकार्पण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर अभिषेक करतील.
-
दरम्यान श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निर्माणाधीन असणाऱ्या राम मंदिराची काही छायाचित्रे सामायिक केली आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये रात्रीच्या वेळी बांधकाम सुरू असणारे राम मंदिर किती सुंदर दिसते ते पाहता येईल.
-
या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज या छायाचित्रांवरून बांधता येतो.
-
याआधीही बांधकामादरम्यानची अनेक छायाचित्रे प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत.
-
या वर्षअखेरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-
२४ जानेवारी, २०२४ पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. (फोटो: पीटीआय)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…