-
दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत उत्साह वाढला आहे. आजपासून म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (एएनआय फोटो)
-
घरे सजवण्यासाठी रंगीबेरंगी बल्ब, तार आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारात विक्री वाढली आहे. (एएनआय फोटो)
-
घराच्या सजावटीसाठी खऱ्या-खोट्या फुलांच्या माळा, झुंबर अशा वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या दिसतात. (एएनआय फोटो)
-
मातीचे दिवे आणि श्री गणेश आणि माता लक्ष्मीच्या छोट्या मूर्तीही बाजारात पाहायला मिळतात. (एएनआय फोटो)
-
गृहसजावटीच्या वस्तूंच्या खरेदीबरोबरच महिला स्वत:साठीही खरेदी करताना दिसत आहेत. (एएनआय फोटो)
-
त्याचबरोबर लहान मुलांसाठी फटाक्यांची विक्रीही बाजारात सुरू झाली आहे. (एएनआय फोटो)
-
धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मानले जाते. त्यामुळेच आज बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. (एएनआय फोटो)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच