-
सणासुदीच्या काळात गावी किंवा पर्यटनानिमित्त दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी ट्रेनचे कन्फर्म ट्रेन तिकीट मिळणे म्हणजे खूप अवघड असते.(संग्रहित छायाचित्र)
-
पण, यंदा तुम्हीही दिवाळीनिमित्त ट्रेनने गावी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कन्फर्म ट्रेन तिकीट सहज मिळवू शकता. (प्रातिनिधिक फोटो – अनप्लॅश)
-
रेल्वेने प्रवाशांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. रेल्वेच्या या नव्या सुविधेमध्ये तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या १० मिनिट आधी कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)
-
सकाळची रेल्वेगाडी धावते सायंकाळी! प्रवाशांचे बेहाल; समस्या सांगूनही लोकप्रतिनिधी घेईनात दखल (संग्रहित छायाचित्र)
-
रेल्वेने प्रवाशांसाठी करंट तिकीट बुकिंग (Current Ticket Booking) नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी कन्फर्म तिकीट मिळवू शकता. (प्रातिनिधिक छायाचित्र)
-
रेल्वेतील सर्व सीट्स भरता याव्यात यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे कोणतीही ट्रेन रिकामी जाणार नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये चालू तिकीट बुक करून कन्फर्म तिकीट मिळवू शकता. तुम्ही ऑफलाइन प्रक्रिया निवडल्यास, तुम्हाला तिकीट काउंटरवर जाऊन आरक्षण फॉर्म भरावा लागेल. (Image Credit -Financial Express)
-
करंट तिकीट सिस्टम अनेक वेळा खूप फायदेशीर ठरते. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही अतिरिक्त शुल्क न भरता कन्फर्म तिकीट मिळवू शकता. (फोटो – संग्रहित)
-
या सुविधेत तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही, ते त्या ट्रेनमधील रिकाम्या सीट्सवर अवलंबून असेल. (संग्रहित फोटो)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा