-
मोठ्यांची दिवाळी फराळाशिवाय आणि लहानग्यांची दिवाळी किल्ल्यांशिवाय पूर्ण होत नाही, असं म्हणतात. सध्या असेच काही किल्ले डोंबिवलीमधील मंडळांनी बनवले आहेत, ते पाहूया.
-
जाणता राजा युवा प्रतिष्ठान गावदेवी मंदिर डोंबिवली पश्चिम यांनी यंदाच्या दिवाळीला रायगडाची भव्य प्रतिकृती तयार केली आहे.
-
दिवाळीची सुट्टीत मंडळातील अनेक मुलं किल्ले बनवतात.
-
ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे रायगड किल्ल्याचा काढलेला फोटो.
-
दत्तनगर बॉईज ग्रुपने खंडेरी-उंदेरी, पद्मदुर्ग आणि जंजीरा या किल्यांची प्रतिकृती तयार केली आहे.
-
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.
-
गडकिल्ल्यांचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी त्यांनी भव्य शस्त्र आणि छायाचित्र प्रदर्शन देखील भरवले आहे.
-
अरुण निवास मित्र मंडळ डोबिंवली पश्चिम यांनी देवगिरी किल्याची भव्य प्रतिकृती तयार केली आहे.
-
अरुण निवास मित्र मंडळ २००८ पासून विविध किल्ले बनवते. त्यांच्या किल्ल्यांना आजपर्यंत अनेक मोठमोठी बक्षिस मिळाली आहेत. मागील ३ वर्षात त्यांनी पद्मदुर्ग, लोहगड, पन्हाळा-विशाळगड मार्गे पावनखिंड असे किल्ले बनवले होते.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”