-
लहानपणी अनेकांनी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकल्या असतील. झपाटलेली गावे, किल्ल्यांवर भुते भटकणे आणि हायवेवर भूत दिसणे अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. भारतात अशी अनेक विचित्र ठिकाणे आहेत ज्यांना पछाडलेले म्हटले जाते. यापैकी काही ठिकाणी रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. भारतात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत जी त्यांच्या झपाटलेल्या कथांसाठी प्रसिद्ध आहेत. आम्ही या मान्यतांची पुष्टी करत नाही, पण शेकडो प्रवाशांनी सांगितलेल्या कथांवरुन येथे स्थानकांवरील प्रचलित कहाण्या सांगण्यात आल्या आहेत.
-
बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल
आजही या बेगुनकोडोर नावाच्या स्टेशनवरून गाड्या जातात तेव्हा त्यात बसलेले लोकं घाबरतात. येथे येणाऱ्या अनेक प्रवाशांना पांढऱ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेचे भूत दिसल्याचे सांगितले जाते. याशिवाय या स्थानकाशी संबंधित अनेक भयावह कथा आहेत. २००९ मध्ये उघडण्यात आलेले हे स्थानक भुतांमुळे ४२ वर्षे बंद होते. (फोटो स्त्रोत: द हॉन्टेड प्लेसेस/फेसबुक) -
रवींद्र सरोबार मेट्रो स्टेशन, कोलकाता
कोलकाताचे हे मेट्रो स्टेशन ‘आत्महत्येचे नंदनवन’ म्हणून देखील ओळखले जाते. लोकांचा असा दावा आहे, की रात्री उशिरापर्यंत सावल्या दिसू शकतात आणि बऱ्याच लोकांनी ओरडण्याचा आवाज देखील ऐकला आहे. (छायाचित्र स्रोत: mtp.indianrailways.gov.in) -
द्वारका सेक्टर 9 मेट्रो स्टेशन, दिल्ली
असा विश्वास आहे की, या स्टेशनवर संतप्त महिलेचा आत्मा भटकत असतो. एका महिलेचे भूत अनेकवेळा या स्थानकाभोवती फिरताना दिसले आहे, जे त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, असे लोकांचे म्हणणे आहे. (फोटो स्रोत: @vish__746/instagram) -
कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश
प्लॅटफॉर्मवर पांढरी साडी नेसलेली भुताटकी स्त्री फिरत असल्याच्या अनेक कथा आहेत. या स्टेशनला पाहणे हा एक भयावह अनुभव असल्याचे सांगितले जाते.(फोटो स्रोत: indiarailinfo) -
नागपूर रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील या नागपूर रेल्वे स्थानकाची इमारत बरीच जुनी आहे. ब्रिटिश सरकारने हे रेल्वे स्टेशन बांधले होते. या स्थानकाच्या जुन्या इमारतीमुळे येथील वातावरण अगदीच गजबजलेले दिसते. (फोटो स्रोत: indiarailinfo) -
धनबाद रेल्वे स्टेशन, झारखंड
या रेल्वे स्थानकाबद्दल स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, येथे एका महिलेचे भूत फिरते. लोक म्हणतात की, या महिलेचा मृत्यू एखाद्या दुःखद घटनेमुळे झाला, त्यानंतर तिचा आत्मा प्लॅटफॉर्मवर भटकत राहतो. (फोटो स्रोत: indiarailinfo) -
चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेल्या चित्तूर रेल्वे स्थानकाविषयी एक प्रसिद्ध कथा आहे की, एकदा हरी सिंह नावाचा CRPF जवान स्टेशनवर ट्रेनमधून खाली उतरला. ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर आरपीएफ जवानाला काही लोकांनी एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्या अधिकाऱ्याचा आत्मा येथे भटकत असल्याची लोकांची समजूत आहे. (फोटो स्रोत: indiarailinfo)
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य