-
Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडमधील सिल्क्यारा येथे बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांना ११ दिवसांपासून बाहेर काढण्याचे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. येथील काही नवीन फोटो समोर आले आहेत. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
घटनास्थळी उपस्थित असलेल्या आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही तासांतच आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले जाऊ शकते. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
घटनास्थळाची पाहणी केली असता ऑगर मशिनच्या सहाय्याने खोदकाम वेगाने सुरू असल्याचे दिसून आले. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
४५ मीटर आतपर्यंत पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
घटनास्थळी १२ रुग्णवाहिकांसह १५ डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. (Source: PTI)
-
खबरदारीचा उपाय म्हणून एअर अॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील या संपूर्ण बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. (Source: Express photo by Chitral Khambhati)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन