-
गाझा पट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालयाला इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केलं आहे. अल शिफातील एका बोगद्यातून दहशतवादी कारवाया आणि इस्रायलच्या ओलिसांना ठेवले असल्याचा दावा इस्रायलने केला होता. त्यासाठी त्यांनी अल शिफा रुग्णालयात ऑपरेशनही राबवले.. (एजन्सी फोटो)
-
इस्रायली लष्कराने अल शिफा रुग्णालयात हल्ला चढवले आहेत. तसंच, तेथे सर्च ऑपरेशनही राबवलं. या ऑपरेशनमुळे अल शिफातील एक बोगदा सापडला असल्याचा दावा IDF ने केला आहे. काही सैनिक आणि पत्रकारांना अरुंद दगडी बोगद्यात नेण्यात आले होते. (रॉयटर्स फोटो)
-
इस्रायल डिफेन्स फोर्स आणि इंटेलिजन्स सपोर्ट एजन्सी यांच्यामार्फत राबवल्या गेलेल्या ऑपरेशननुसार, ५५ मीटर लांब आणि १० मीटर खोल असलेला दहशतवादी बोगदा शिफा रुग्णालयात सापडला आहे. या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध लष्करी कारवाया करणारी यंत्रे होती. इस्रालयली लष्कराला रोखण्यासाठी येथे ब्लास्टप्रुफ दरवाजा, फायरिंग होल सारख्या सुरक्षा यंत्रणाही होत्या. “हा दरवाजा हमास दहशतवादी संघटनेद्वारे इस्रायली सैन्याला कमांड सेंटर्समध्ये आणि हमासच्या भूमिगत मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरला जातो.”, असंही IDF ने X पोस्टवर म्हटलं आहे. (रॉयटर्स फोटो)
-
“गेल्या चार आठवड्यांपासून आम्ही सांगत आहोत की, गाझातील नागरिक आणि अल शिफा रुग्णालयातील रुग्णांना हमासने मानवी ढाल म्हणून वापलं आहे आणि हा त्याचा पुरावा आहे”, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. .सैन्याने भूमिगत लपण्याचे ठिकाण अद्याप सर्वात महत्त्वपूर्ण शोध म्हणून चित्रित केला आहे. (एपी फोटो)
-
बोगद्याच्या शेवटी असलेल्या लिव्हिंग क्वार्टरमध्ये गंजलेल्या पांढऱ्या टाइलने बनवलेल्या खोलीत एअर कंडिशनर, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि लोखंडी खाट दिसत होती. त्यांचा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. (रॉयटर्स फोटो)
-
बुधवारी, इस्रायली सैनिकांनी परदेशी पत्रकारांना शिफा येथे सापडलेली शस्त्रे दाखवली, ज्यात डझनभर एके-४७ असॉल्ट रायफल, २० ग्रेनेड आणि अनेक ड्रोन यांचा समावेश आहे. (रॉयटर्स फोटो)
-
हमास आणि रुग्णालय प्रशासनाने इस्रायलचे आरोप फेटाळून लावले आहेत. अल शिफा रुग्णालयाखाली बोगदा सापडल्यानंतर याबाबत हमासने स्पष्टीकरण दिलं आहे. संपूर्ण पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये शेकडो किलोमीटरचे गुप्त बोगदे, बंकर आणि ऍक्सेस शाफ्टचे जाळे आहेत. या रुग्णालयातील हा बोगदाही नागरी पायाभूत सविधेपैकी एक आहे. (रॉयटर्स फोटो)
-
हमासच्या ७ ऑक्टोबरच्या सीमापार हल्ल्यामुळे हे युद्ध सुरू झाले ज्यात किमान १२०० लोक मारले गेले आणि २४० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी हमासच्या सैनिकांनी भूमिगत नेटवर्कचा वापर केला आहे. (रॉयटर्स फोटो)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”