-
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #Melodi हा हॅशटॅग वापरला आहे. (फोटो स्रोत: @giorgiameloni/instagram)
-
कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “COP-28 मधील चांगले मित्र”. या सेल्फीमध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान हसताना दिसत आहेत. पीएम मेलोनी यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (REUTERS फोटो)
-
पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगबाबत सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण पीएम मेलोनी आणि मोदी या दोन शब्दांना एकत्र करून #Melodi तयार करण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)
-
अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’ (COP-28 समिट) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दरम्यान, पीएम मेलोनी यांनी पीएम मोदींसोबत सेल्फी घेतला आहे. (एपी फोटो)
-
हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मेलोनीही सहभागी झाल्या होत्या. यावेळीही पीएम मोदी आणि मेलोनी यांचे काही फोटो व्हायरल झाले होते आणि सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. (पीटीआय फोटो)
-
त्याचवेळी, ऑक्टोबरमध्ये, पीएम जॉर्जिया यांनी पती एंड्रिया जियाम्ब्रुनोपासून घटस्फोट घेतल्याची बातमी आली होती. जॉर्जिया यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते की, त्या त्यांच्या पतीसोबतचे १० वर्षांचे नाते संपवत आहे. (फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
-
जिआमब्रुनो आणि मेलोनी यांचे लग्न झालेले नाही. मात्र मागील 10 वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे. तिचा जन्म 2006 मध्ये झाला होता. त्यामात्र अँड्रिया जियाम्ब्रुनोचे दुसऱ्या महिलेबरोबर असलेल्या अफेअरमुळे जॉर्जिया यांनी त्यांच्यापासून विभक्त होण्याचे निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (फोटो स्रोत: @giorgiameloni/instagram)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”