-
मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे लक्झरी कारचे मोठे कलेक्शन आहे.
-
पण तुम्हाला माहित आहे का की भारतात जगातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे? आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगत आहोत ज्यांच्याकडे जगातील सर्वात महागडी कार आहे. व्हीएस रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे. (फोटो स्त्रोत: ब्रिटिश बायोलॉजिकल/फेसबुक)
-
व्हीएस रेड्डी हे ब्रिटीश बायोलॉजिकल या सर्वात मोठ्या वैद्यकीय पोषण उत्पादन कंपनीचे मालक आहेत,
-
ज्यांच्याकडे जगातील सर्वात महागडी कार Bentley Mulsanne EWB Centenary Edition आहे. या कारची किंमत १४.५ कोटी रुपये आहे. (फोटो स्रोत: @evoIndia/Twitter)
-
रेड्डी यांची ही खास एडिशन लक्झरी कार बेंटलेच्या खास आणि महागड्या मॉडेल्सपैकी एक आहे. कंपनीने केवळ १०० कार बनवल्या आहेत, त्यापैकी एक भारतातील व्हीएस रेड्डी यांच्या मालकीची आहे. (फोटो स्त्रोत: ब्रिटिश बायोलॉजिकल/फेसबुक)
-
या कारमध्ये ६.७५ लीटर ८ इंजिन आहे जे ५०६ हॉर्स पॉवर आणि १०२० NM टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार ५.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड २९६ किमी प्रतितास आहे. या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १२.३ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पॉवर-अॅडजस्टेबल सीट यांसारखी अनेक अपडेटेड फीचर्स आहेत. (फोटो स्रोत: @evoIndia/Twitter)
-
व्हीएस रेड्डीबद्दल यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते कर्नाटकातील बेंगळुरू इथं राहतात. त्यांना ५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते ब्रिटिश बायोलॉजिकलचे एमडी तसेच संस्थापक आहेत. (फोटो स्त्रोत: ब्रिटिश बायोलॉजिकल/फेसबुक)
-
ब्रिटीश बायोलॉजिकल वेबसाइटनुसार, ही ‘द प्रोटीन पीपल’ म्हणून ओळखली जाणारी एक संशोधन-आधारित हेल्थकेयर न्यूट्रास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने बनवलेली उत्पादनं बालरोग, मधुमेह, स्त्रीरोग, हृदयरोग, हिपॅटायटीस आणि जेरियाट्रिक न्यूट्रिशनसाठी वापरली जातात. (फोटो स्त्रोत: ब्रिटिश बायोलॉजिकल/फेसबुक)
-
ही कंपनी १९८८ मध्ये स्थापन झालेली भारतातील सर्वात मोठी मेडिकल न्यूट्रीशन उत्पादन कंपनी मानली जाते. (फोटो स्त्रोत: ब्रिटिश बायोलॉजिकल/फेसबुक)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल