-
बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचौंग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. वादळामुळे चेन्नई आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
पावसामुळे चेन्नईतील रस्त्यांसह विमानतळावर पाणी साचले आहे. पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
पावसामुळे चेन्नई विमानतळाच्या धावपट्टी आणि भुयारी मार्गावर पाणी साचले आहे, त्याचा उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. (Photo Source: @akajithofficial/twitter)
-
चक्रीवादळामुळे विमानासह रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहेत. तर काही उड्डाणे उशिरा केली जाणार आहेत.
-
अनेक भागात तर रस्त्यांव्यतिरिक्त लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने एनडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे.
-
रस्त्यांसह घरांमध्येही पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी काही तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. (Photo Source: @fathimafarhanaS/twitter)
-
मिचौंग चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे बरेच नुकसान झाले आहे. या फोटोत पोलीस रस्त्यावर उन्मळून पडलेले झाड हटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
-
महापालिकेचे कर्मचारीही परिसरात तुंबलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर किनारपट्टीवरील लोकांच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळामुळे ५ डिसेंबरला आणखी पाऊस पडू शकतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Photo Source : PTI)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: अक्षर पटेलच्या रूपात भारताला पाचवा धक्का, टीम इंडियाने गाठला २०० धावांचा पल्ला