-
मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी दक्षिण भारतीय किनारपट्टीवर धडकले, ज्यामुळे जोरदार पाऊस आणि पूर आला.
-
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशातील बापटलाजवळ चक्रीवादळ धडकले.
-
चक्रीवादळ हळूहळू शांत होण्याची शक्यता आहे
-
सप्टेंबर २०२१ मधीव गुलाब चक्रीवादळानंतर दोन वर्षांनी आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडणारे हे पहिले चक्रीवादळ आहे.
-
चेन्नईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
-
आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे ९०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
-
वैद्यकीय मदत शिबिरांसह बापटला जिल्ह्यात २१ चक्रीवादळ निवारे उभारण्यात आले आहेत.
-
मदत आणि बचाव कार्यासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरी येथे एकूण २९ एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.
-
आंध्र प्रदेशात १४० हून अधिक ट्रेन आणि ४० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
-
आंध्र प्रदेशात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु सखल भागात पाणी साचल्याने लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”