-
भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कार्सची मागणी वाढली आहे.
-
Hyundai Motors ने जुलै महिन्याच्या १० तारखेला भारतात लाँच केलेल्या Subcompact SUV ला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
-
या एसयूव्हीला पहिल्या पाच महिन्यांत ग्राहकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत या कारला १ लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत.
-
लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.
-
Hyundai च्या या कारची विक्री चांगली सुरू असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण ३१ हजार १७४ युनिट्सची विक्री झाली.
-
लाँचच्या पहिल्या महिन्यात ७ हजार युनिट्स, ऑगस्टमध्ये ७ हजार ४३० युनिट्स, सप्टेंबरमध्ये ८ हजार ६४७ युनिट्स आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये ८ हजार ०९७ युनिट्सची विक्री झाली.
-
ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी असून Hyundai च्या लाइनअपमध्ये Exeter खूप लोकप्रिय झाले आहे.
-
सध्या या मायक्रो एसयूव्हीसाठी सरासरी प्रतीक्षा कालावधी सुमारे ४ महिने आहे.
-
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम या कारमध्ये पाहायला मिळतात.
-
कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील आहेत.
-
प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे.
-
या कारची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. यात पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्यायही मिळतो. (फोटो सौजन्य – financial express)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?