-
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. असेच लडाख हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की लडाखमध्ये एक गाव असे आहे, जे स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचा भाग होते, पण नंतर भारताचा भाग बनले. (Photo Source: Turtuk/Facebook)
-
या गावाचे नाव तुरतुक असे आहे. हे नुब्रा खोऱ्यातील लेह जिल्ह्यात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यानंतर १९७१ मध्ये भारतीय लष्कराने हे गाव ताब्यात घेतले. १६ डिसेंबर १९७१ रोजी सकाळी या गावातील लोक भारतीय झाले. (Photo Source: @backpacker.diaries/instagram)
-
तुरतुक नावाच्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर खूप सुंदर आहे. हा परिसर कराकोरम पर्वतांनी वेढलेला आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर कराकोरम टेकड्यांवर जाऊ शकता. (Photo Source: @ladakh_insta_diaries/instagram)
-
१९७१ नंतर हे गाव बराच काळ जगापासून दूर राहिले, पण २०१० मध्ये ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. लडाखच्या शेवटी वसलेले हे गाव तिथल्या सभ्यता आणि संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. (Photo Source: @ladakh_tourism_offical/instagram)
-
तुरतुकमध्ये बाल्टी संस्कृतीचे लोक राहतात. ज्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे. या गावात इंटरनेट आणि फोन कनेक्टिव्हिटी नगण्य आहे. पण या गावात सध्या जंगल, पर्वत, नद्या, धबधबे यांचे दृश्य खूप खास आहे. (Photo Source: @orr_krowitz/instagram)
-
देशाच्या एका टोकाला वसलेल्या या गावातील लोकांचे जीवन अत्यंत साधे आहे. येथील लोक छोटे-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. या गावात राहण्यासाठी फारशी हॉटेल्स नाहीत. पण येथील लोकांच्या घरामध्ये होमस्टेची सोय आहे. (Photo Source: @orr_krowitz/instagram)
-
तुरतुकमध्ये हिवाळ्यात खूप थंडी असते. येथे जोरदार बर्फवृष्टी होते. या काळात इथं फिरणं थोडं कठीण असतं. तुरतुकला भेट देण्यासाठी योग्य काळ जून ते सप्टेंबर हा आहे. (Photo Source: @travelknot.id/instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख