-
Baba Vanga Prediction For 2024 :बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. कुठेही लिहून न ठेवता केवळ अनुयायांच्या माध्यमातून पुढे आलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत. २०२४ साठी बाबा वेंगानीं काय अंदाज वर्तवले आहेत, पाहूया..
-
बाबा वेंगा यांनी पुढील वर्षी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय शत्रूपेक्षा देशातीलच एखाद्या व्यक्तीकडून होऊ शकतो असे त्यांनी भाकीत केले आहे
-
बाबा वेंगा यांनी युरोपला दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागेल असेही भाकीत केले आहे. त्यांच्या मते जगातील एखादा मोठा देश युरोपवर हल्ला करू शकतो.
-
पुढच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, कर्जाची वाढती पातळी आणि वाढता भौगोलिक व राजकीय तणाव हे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे मुख्य घटक ठरतील.
-
पुढच्या वर्षी हवामानाची गुणवत्ता कमी होऊन नैसर्गिक आपत्ती येतील असेही त्यांनी भाकीत केले आहे.
-
सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होईल, प्रगत हॅकर्स हे पॉवर ग्रिड्स (वीज) आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स (पाणी) यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकेल.
-
वैद्यकीय प्रगतीमुळे २०२४ मध्ये अल्झायमर आणि कर्करोगासारख्या असाध्य रोगांवर नवीन उपचार उपलब्ध होतील असे वेंगा यांनी म्हटले आहे.
-
क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठी प्रगती होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
-
(टीप: वरील लेख ही प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन