-
जगभरात कारची आवड असणाऱ्यांची संख्या खूप आहे. प्रत्येक व्यक्तीचे मनपसंत कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. मनपसंत कार खरेदी करण्यासाठी कारप्रेमी कोट्यवधी रुपये मोजायलाही मागेपुढे पाहत नाही. अशा परिस्थितीत आज आपण जगातील सर्वात महागड्या कार आणि त्यांच्या किमती जाणून घेऊयात…
-
Pagani Zonda HP Barchetta
जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीत Pagani Zonda HP Barchetta या कारचे नाव समाविष्ट आहे. या कारची किंमत १२१ कोटी रुपये आहे. या कारच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर या कारची टॉप स्पीड ३३५ किमी प्रतितास आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग अवघ्या काही सेकंदात पकडते. (फोटो स्त्रोत: pagani.com) -
Rolls-Royce Sweptail
रोल रॉयस स्वीप्टेल कार ही जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची अंदाजे किंमत १०२ कोटींहून अधिक आहे. या कारमध्ये ६.७५ लिटर व्ही-१२ इंजिन देण्यात आलं आहे. (फोटो स्रोत: rolls-roycemotorcars.com) -
Mercedes-Maybach Exelero
ही एक अल्ट्रा हाय-परफॉर्मन्स कार असून या कारची किंमत ५४.९१ कोटी इतकी आहे. ही कार ६९०bhp ट्विन-टर्बोचार्ज्ड V१२ इंजिनसह येते. ही कार ० ते १०० किमी प्रतितास ४.४ सेकंदात वेग पकडते आणि ३४९ किमी/ताशी वेग वाढवते. (फोटो स्त्रोत: maybach.com) -
Lamborghini Veneno
ही कार २०२३ च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. लॅम्बोर्गिनी कंपनीच्या या सुपरकारची किंमत सुमारे ४५ कोटी रुपये आहे. ही कार ६.५-लीटर V12 इंजिनसह येते, जी ७४० bhp पॉवर देते. ही कार ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ० ते १०० पर्यंत वेग वाढवू शकते. (फोटो स्त्रोत: lamborghini.com) -
Koenigsegg CCXR Trevita
स्वीडिश कार निर्माता कंपनीच्या या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ३५ कोटी आहे. मायलेजच्या बाबतीत ही कार सर्वात मजबूत आहे. ऑटोमॅटिक पॅडल शिफ्ट गिअरबॉक्ससह ही कार CCXR Trevita ४१९ किमी प्रति तास वेगाने चालते. ही कार आपल्या लूक आणि फीचर्समुळे जगभरात ओळखली जाते. (फोटो स्त्रोत: koenigsegg.com) -
Bugatti Veyron Mansory Vivere
ही जगातली सर्वात वेगवान कार मानली जाते. २००५ मध्ये लाँच झालेल्या या कारची किंमत ३० कोटी रुपये आहे. त्याची इंजिन पॉवर १२०० hp आहे आणि ही कार ४०६ kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. (फोटो स्त्रोत: mansory.com)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार