-
भारतातील बहुतेक लोकप्रिय अभिनेते, क्रिकेटपटू आणि उद्योगपतींची मुले मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. नुकतंच या शाळेमध्ये वार्षिक दिन साजरा करण्यात आला.
-
यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर अॅन्युअल डे फंक्शनमध्ये परफॉर्म करताना दिसले.
-
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते इयत्ता 12वीपर्यंतचा अभ्यास केला जातो. नोव्हेंबर 2002 मध्ये ही शाळा बनवून पूर्ण झाली होती.
-
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या शाळेची स्थापना रिलायन्स इंडस्ट्रीजने २००३ मध्ये केली होती.
-
या सात मजली शाळेतील प्रत्येक वर्गात मल्टीमीडिया प्रोजेक्टर, कस्टम मेड फर्निचर, ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन, लॉकर्स, अॅड्रेस सिस्टम आणि इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
शाळेमध्ये टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच इतर मैदानी खेळांसाठी अनेक पर्याय आहेत.
-
याशिवाय आर्ट रूम, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मल्टीमीडिया ऑडिटोरियम देखील आहे.
-
शाळेत एक आधुनिक उपहारगृह देखील आहे, जिथे विद्यार्थ्यांना नाश्ता आणि जेवण दिले जाते.
-
तसेच, शाळेमध्ये वैद्यकीय केंद्र देखील आहे जे संपूर्ण वेळ वैद्यकीय सेवा प्रदान करते.
-
सारा अली खान, सुहाना खान, खुशी कपूर आणि आर्यन खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सची मुले या शाळेतून उत्तीर्ण झाली आहेत.
-
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनीही येथूनच शालेय शिक्षण पूर्ण केले.
-
त्याचवेळी रोहित शर्माची मुलगी समायरा शर्माही येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.
-
नीता अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण व्हायला जवळपास दहा महिने लागले होते.
-
तर ही शाळा बांधण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
(फोटो स्त्रोत: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल/फेसबुक)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर