-
डिसेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होते. तुमच्याही घरी आतापर्यंत साधारण १० एक लग्नपत्रिका आल्याच असतील. कधी ओळखीतल्या, कधी मैत्रीतल्या तर कधी नात्यातल्या लग्नांना हजेरी लावणे हे भागच असतं
-
काही वेळा दोन लग्नांच्या किंवा कार्यक्रमांच्या तारखा एकाच दिवशी येतात, किंवा नेमकं तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल तेव्हाच कार्यक्रम असतो तेव्हा नक्की जायचं कुठे हे ठरवण्यासाठी फक्त तुम्हाला कशाप्रकारे बोलावलंय हे ओळखणं महत्त्वाचं.
-
कार्यक्रमांच्या पत्रिका या आमंत्रण किंवा निमंत्रण स्वरूपात असतात, हे दोन्ही शब्द सारखेच वाटत असले तरी त्यांच्यामागील आग्रह हा वेगवेगळा आहे. याचाच अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत.
-
जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी किंवा विशिष्ट कार्यक्रमाला बोलवतो. पण या कार्यक्रमाची कोणतीही वेळ ठरलेली नसते. तेव्हा अशा प्रकारच्या बोलवण्याला आमंत्रण असं म्हणतात
-
उदा. आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र- मैत्रिणींना घरी जेवणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बोलवत असतो. त्याची वेळ ठरलेली नसते. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना शक्य त्या वेळी येऊ शकतात.
-
शब्दांची कहाणी या पुस्तकात लेखक सदानंद कदम सांगतात की, आमंत्रण पत्रिका ही विशेष आग्रह करून दिलेली असते त्यामुळे वेळ जरी ठरलेली नसली तरी जेव्हा ठरेल तेव्हा आमंत्रणाचा मान ठेवून कार्यक्रमाला जाणं आवश्यक असतं.
-
जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरलेली असते आणि त्यातील कार्यक्रम एका विशिष्ट वेळीच पार पडणार असतो. या ठिकाणी वेळेचं बंधन असतं. अशा प्रकारच्या बोलवण्याला निमंत्रण असं म्हणतात
-
उदा. लग्नाची पत्रिका, या पत्रिकेत लग्नाचा मुहूर्त दिलेला असतो आणि पाहुण्यांना त्याच वेळेत लग्नाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं असतं. याशिवाय संस्थाचे वार्षिक कार्यक्रम किंवा असे सर्वच कार्यक्रम ज्यात येणाऱ्या पाहुण्यांना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असतं
-
लेखक सदानंद कदम सांगतात की, निमंत्रण हे साधारणपणे अनेकांना दिलं जातं म्हणूनच त्याला जाहीर निमंत्रण म्हणतात, अशावेळी आपण तिथे यायलाच हवं असा काही आग्रह नसतो. त्यामुळे निमंत्रण काही वेळा चुकवलं तरी चालतं. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”