-
देशभरात एका बाजूला करोनाचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. (Express Photo by Tashi Tobgyal)
-
गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
देशातील करोनाबाधितांची संख्या आता ४.५० कोटी (४,५०,०७,२०२१) वर गेली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
केरळमध्ये एका मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
करोनातून बरे झालेल्यांची टक्केवारी ९८.८१ टक्के इतकी आहे. आतापर्यंत देशभरात ४,४४,७०,८८७ लोकांनी करोनावर मात केली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
गुरुवारपर्यंत देशात करोनाचा उप-प्रकार JN.1 चे २२ रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी २१ रुग्ण गोव्यातील आहेत. (Express Photo by Amit Mehra)
-
केरळमध्ये गेल्या २४ तासांत २६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
कर्नाटक सरकारने कोव्हिड व्यवस्थापनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय कॅबिनेट उपसमिती स्थापन केली. (Express Photo by Tashi Tobgyal)
-
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत कोव्हिडवरील लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत. (Express Photo by Tashi Tobgyal)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?