-
आज जगातील सर्वात लांब रेल्वे नेटवर्कमध्ये भारतील रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहोत. भारताच्या रेल्वे नेटवर्कमध्ये काही रेल्वे मार्गांचा समावेश आहे जिथून ट्रेन जाताच हिरवेगार सुंदर जंगल, उंचच- उंच पर्वतरांगा भुरळ घालतात, तर पक्षांची किलबिलाट शिवाय वाहते धबधबे, नदीच्या पाण्याची झुळझुळ कानी पडते मिळते. (photo – @EasternRailway twitter)
-
एकूणच काय तर या रेल्वे मार्गांवर प्रवास करणे म्हणजे पृथ्वीवर राहून स्वर्गीय आनंद घेतल्यासारखा वाटतो. त्यामुळे आज आपण भारतातील पाच सर्वांत सुंदर रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेणार आहोत; जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. (photo – @GoHimachal_ twitter)
-
हिरवेगार जंगल, सुंदर नद्यांमधून जाणारा या रेल्वे मार्गात तुम्हाला मोठमोठ्या पर्वतरांगा, अनेक आश्चर्यकारक वळणे, नदीचे पूल, तलाव व धबधबे असे निसर्गाच्या सुंदर ठेव्यांचे दर्शन घडते. (photo creadit – National Train Enquiry System)
-
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (नवीन जलपाईगुडी-दार्जिलिंग) युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या नॅरोगेज रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करताना भान हरपून जायला होते. या सुंदर राइडचा आनंद घेण्यासाठी जगातील विविध भागांतून लोक दार्जिलिंगमध्ये येतात. ही टॉय ट्रेन सुंदर पर्वतांमधून जाते; जिथे कांचनजंगा पर्वताची अद्भुत दृश्ये पाहता येतात. चहाच्या बागा पाहण्याची सुंदर संधी मिळते. ( संग्रहित फोटो)
-
हिमालयीन राणी (कालका-शिमला) कालका ते शिमला हा रेल्वेमार्ग तुम्हाला सर्वांग सुंदर प्रवासाची अनुभूती देईल. हा अविश्वसनीय प्रवास सुमारे पाच तास चालतो. या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना सुंदर, अविस्मरणीय असे निसर्गसौंदर्य अनुभवण्यास मिळते. या मार्गावर सुंदर दऱ्या आणि हिरवीगार जंगले असल्याने पर्यटकांना कालका-शिमला हा रेल्वेमार्ग नेहमीच भुरळ घालतो. (photo – financial express)
-
कांगडा व्हॅली रेल्वे (पठाणकोट-जोगिंदरनगर) कांगडा व्हॅली रेल्वे भारतातील सर्वोत्तम रेल्वेपैकी एक असू शकते. या मार्गावरून प्रवास केल्यावर तुम्हाला धौलाधर पर्वतराजीचे सुंदर दृश्य अनुभवण्याची संधी मिळेल. भारतातील या सर्वांत सुंदर रेल्वेमार्गावर तुम्ही एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे.(photo – wikipedia)
-
जिथे तुम्हाला ओसाड वाळवंट जमीन, वाळूचे ढिगारे, वाळवंटातील वन्यजीव आणि आदिवासींचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. हा रेल्वेमार्ग राजस्थानच्या थार वाळवंटातील कोरड्या जंगलातून आणि ओसाड जमिनीतून जातो. (PHOTO – @meinbhiphotographer instagram)

