-
अयोध्येत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. प्रभू राम लल्ला २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.
-
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराची झलक येथील रेल्वे स्टेशनवरूनच पाहता येत आहे. अयोध्या राम मंदिरासोबतच अयोध्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही करण्यात आले आहे.
-
अयोध्या रेल्वे स्थानकाची वास्तुकला श्री रामजन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे. रेल्वे स्थानकाच्या नव्या रुपासह प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत.
-
एवढेच नाही तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून तयार केले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला जाणार आहेत.
-
पंतप्रधान मोदी अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशन आणि विमानतळासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी येथे दोन नवीन अमृत भारत आणि 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
-
अयोध्येतील नवीन विमानतळाचे नाव महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे असणार आहे. अयोध्येतील हे विमानतळही राम मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.
-
अयोध्या रेल्वे स्थानकाप्रमाणेच विमानतळ टर्मिनल इमारतीचे आतील भाग स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी विविध चित्रे यांनी सजवलेले आहेत.
-
या विमानतळाच्या मदतीने या भागात कनेक्टिव्हिटी, पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
-
अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर २३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांनाही दर्शनासाठी खुले करण्यात येईल.
(फोटो: पीटीआय/एएनआय)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल