-
जपान सोमवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले, यात हजारो घरांची पडझड तर अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा गेल्या. दरम्यान गोठणाऱ्या तापमानात आता हजारो लोकांना वीजेविना राहावे लागत आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
जपानमध्ये ७.६ तीव्रतेच्या भूकंप झाल्या त्यानंतर जपानच्या पश्चिम सीबोर्ड सोमवारी मध्यरात्री सुमारे १ मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळून आल्या. यावेळी काही किनारी भागातील रहिवासी जीव वाचवण्यासाठी धावू लागले (फोटो: रॉयटर्स)
-
भूकंपाच्या धक्क्याने इशिकावा प्रांतातील नोटो शहरातील किनाऱ्यावरील अनेक घरं आणि वाहनं वाहून गेली. (फोटो: रॉयटर्स)
-
पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सांगितले की, “भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य राबवले जात आहे, ही काळाशी लढाई आहे.”
-
इशिकावा प्रांतातील वाजिमा येथे भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर लोकांना ज्युनियर हायस्कूलच्या पार्किंगच्या जागेवर उंच ठिकाणी हलवण्यात आले. (फोटो: रॉयटर्स)
-
सोमवारी भूकंपाचा पहिला धक्का बसल्यापासून आतापर्यंत 90 हून अधिक धक्के जाणवले आहेत, जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी जोरदार धक्के बसू शकतात. (फोटो: रॉयटर्स)
-
टोयामा येथील एका सुपरमार्केटमध्ये भूकंपाचा धक्का बसल्याने दुकानदारांमध्येही मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (फोटो: रॉयटर्स)
-
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती वाजिमा सिटी, इशिकावा प्रीफेक्चरमध्ये आग लागली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, १०० हून अधिक इमारती जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
जपानमध्ये भूकंपादरम्यान ओसाका येथील युनिव्हर्सल स्टुडिओझातील अनेक लोक जीव वाचवण्यासाठी खाली बसले. (फोटो: रॉयटर्स)
-
परिवहन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा धक्का बसल्यापासून चार द्रुतगती मार्ग, दोन हाय-स्पीड रेल्वे सेवा, 34 लोकल ट्रेन आणि 16 फेरी लाईन्स थांबवण्यात आल्या आहेत, तर 38 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
मुख्य बेट होन्शुच्या पश्चिम किनार्यावरील नऊ प्रांतातील ९७००० हून अधिक लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स हॉल आणि शालेय व्यायामशाळेत रात्र काढली, सामान्यत: आपत्कालीन परिस्थितीत निर्वासन केंद्र म्हणून वापरले जाते. (फोटो: रॉयटर्स)
-
हा भूकंप अशा वेळी आला आहे जेव्हा जपानच्या आण्विक उद्योगाला २०११ च्या भूकंपापासून आणि त्सुनामीमुळे फुकुशिमामध्ये आण्विक विघटन झाल्यापासून स्थानिक लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
फोटोमध्ये, संरक्षणात्मक हेल्मेट घातलेला रहिवासी जपानमधील इशिकावा प्रांतातील नानाओ येथील त्याच्या उध्वस्त झालेल्या घरातून त्याचे सामान घेऊन जात आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भूकंपानंतर जपानला आवश्यक ती मदत करण्यास अमेरिका तयार आहे. (फोटो: रॉयटर्स)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल