-
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ ला होणारा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. बहुचर्चित राम मंदिराची रचना ते प्रभू श्रीरामाची मूर्ती याविषयी सर्वांनाच कुतूहल आहे
-
भगवान श्रीरामाचे भक्त जगभरात आहेत. पण आज आम्ही अशा एका अनोख्या समुदायाविषयी सांगणार आहोत ज्यांची रामभक्ती जगावेगळी आहे. छत्तीसगडच्या रामनामी समुदायाची ख्याती जगभरात आहे
-
आऊटलूक इंडियाच्या अहवालानुसार, या समुदायाच्या लोकांनी आपल्या संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले आहे.
-
ज्या व्यक्ती आपल्या माथ्यावर रामाचे नाम गोंदवले आहे त्यांना सर्वांगी रामनाम म्हटले जाते तर संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवणाऱ्या व्यक्तीस ‘नखशिख’ म्हटले जाते.
-
रामनामी समुदायातील लोकांचा पोशाख संपूर्ण शरीरावर रामाचे नाव, राम नावाची शाल, मोरपंखाची पगडी ते घुंगरू असा असतो
-
रामनामी सांप्रदायात ‘राम’ हे नाव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, मात्र ही मंडळी कधी कोणत्या मंदिरात जात नाहीत किंवा कधी कोणत्या मूर्तीची पूजा करत नाहीत
-
या समुदायातील लोक आपल्या मनुष्यरुपी शरीरालाच मंदिर मानतात. एकमेकांना अभिवादन करताना सुद्धा ते रामाचेच नाव घेतात
-
शरीरावर रामाचे नाव गोंदवून मंदिराचा त्याग करण्यामागे एक बंडाची कहाणी आहे. असं म्हणतात, या समुदायातील लोकांनी काही उच्चवर्णीयांकडून यापूर्वी मंदिरात प्रवेश नाकारला गेला होता.
-
याचा विरोध म्हणून तत्कालीन लोकांनी प्रभू रामाचे नाव पूर्ण शरीरावर गोंदवून निषेध केला. या समाजाची स्थापना छत्तीसगड राज्यातील जांजगीर-चांपा येथील चारपारा या छोट्या गावी झाली होती
-
असं म्हणतात १८९० साली परशुराम नामक एका युवकाने समाजाचा पाया रोवला होता. यास विरोध झाला होता त्यानंतर १९१२ मध्ये परशुराम व त्याच्या अनुयायांनी ब्रिटिश कोर्टात अपील केले होते
-
जिल्हा न्यायाधीशांनी परशुरामाच्या व अनुयायांच्या बाजूने निकाल देत असे सांगितले होते की, ‘राम’ हे नाव कोणत्या समूहाची संपत्ती नाही त्यावर साऱ्यांचा अधिकार आहे. त्यानंतर शरीरावर रामाचे नाव गोंदवण्याचे प्रमाण वाढले.
-
रामनामाचा वारसा पुढच्या पिढीतही जपण्यासाठी या समुदायातील बाळ जेव्हा २ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या छातीवर राम नाव गोंदवले जाते.(सर्व फोटो: @ramnamicommunity/instagram)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन