-
अयोद्धेत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मंदिराच्या बांधकामाची तयारी अंतिम स्वरुपात आली आहे.
-
दरम्यान रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
उद्घाटनापूर्वी आलेली ही छायाचित्रे रात्री काढण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी दिव्यांनी उजळून निघालेले मंदिर खूप सुंदर दिसत आहे.
-
मंदिराच्या आत भव्य कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या भिंती आणि छतावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे.
-
मंदिराच्या खांबावर, भिंतीवर आणि छतावर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या फरशीवरही डिझाईनिंग करण्यात आले आहे.
-
राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरूण मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
-
राम मंदिराचे गर्भगृहही तयार झाले आहे. यासोबतच राम मंदिरात अभिषेक करण्यात येणाऱ्या मूर्तीचीही निवड करण्यात आली आहे.
-
१६ जानेवारीपासून राम मंदिराच्या अभिषेक विधीला सुरुवात होणार आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
-
या सोहळ्याला देशभरातील ४ हजार संत व लाखो भाविक उपस्थि राहणार आहेत.
-
क्रीडा, बॉलीवूड, उद्योग आणि अध्यात्माशी संबंधित अनेक व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
-
राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकची सर्व देशवासीय आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
२३ जानेवारीपासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. म्हणजेच प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून भाविकांना रामलालाचे दर्शन घेता येईल.
(फोटो स्रोत: @ShriRamTeerth/twitter)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल