-
लाखो, करोडो अशा मोठ्या आकड्यांचे अगदी क्षणात हिशोब करणारा कॅलक्युलेटर सर्वांना माहिती असेलच. कॅलक्युलेटरचा वापर सर्वांनीच कधी ना कधी केलाच असेल.
-
तुम्हाला मोठ-मोठ्या संख्यांचे हिशोब करायचा असो त्यामधील बेरीज-वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी कॅलक्युलेटर महत्वाची भूमिका बजावतो.
-
कॅलक्युलेटरमुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड अगदी अचूक झटक्यात करणे शक्य होते.
-
आजकाल तुमच्या मोबाईल आणि संगणकातही कॅलक्युलेटर येऊ लागले असल्याने मूळ कॅलक्युलेटरचा वापर कमी होताना दिसतो.
-
तरीही आपण बाहेरील दुकानात खरेदीसाठी गेले असता विक्रेता कॅलक्युलेटरचा वापर करताना दिसतो, त्याचप्रमाणे बरेच लोकं हिशोब करण्यासाठी कॅलक्युलेटरचा वापर करताना दिसतात.
-
Calculator हा शब्द calculaire या लॅटिन शब्दापासून बनला आहे.
-
आपण आपल्या आयुष्यात दररोज इंग्रजी शब्द इतके वापरतो की, ज्याचा मराठीत अर्थ जर कुणी आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तरही देणं आपल्यासाठी कठीण होते.
-
त्यातील एक म्हणजे कॅलक्युलेटर. कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का? फार कमी लोकांना ठाऊक असेल.
-
आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. वास्तविक, कॅलक्युलेटरला मराठीत ‘गणकयंत्र’ आणि हिंदीत ‘परिकलक’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य : freepik )

बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी