-
नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये मोसमातील पहिला आंबा दाखल झाला आहे.
-
रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत
-
पहिल्या आंब्याच्या पेट्यांची पूजा करण्यात आली आहे.
-
डॉ. सुनील सुर्वे व पुष्कर सुर्वे यांच्या पावस येथील बागेतून हे आंबे नवी मुंबईत आले आहेत
-
यंदाच्या मोसमात आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे, असे व्यापारी अमोल शिंदे यांनी सांगितले आहे
-
सध्या आंब्याच्या या पेटीचा मुंबईतील दर १० ते १५ हजार रुपये इतका आहे.
-
तर पुण्यात सुद्धा मानाच्या आंब्याची पहिली पेटी काल दाखल झाली होती. चार डझन आंब्याची पहिली पेटी लिलावात २१ हजार रुपयात विकली गेली आहे
-
मुंबई व पुण्यातील दरांची आकडेवारी पाहता प्रत्येक फळ ४०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले आहे.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित