-
भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी, दाट धुक्यात कर्तव्यपथावर पथसंचलनाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होय. फ्रेंच नेत्याला हा सन्मान देण्याचा हा सहावा प्रसंग आहे.
२६ जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. या पथसंचलनामध्ये दिल्ली पोलिसांच्या सर्व महिला तुकड्या प्रथमच कर्तव्य पथावर दिसणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट लैंगिक समानतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि सैन्य दलातील महिलांना सक्षम करणे हे आहे. हे पाऊल प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध दल आणि विभागातील महिला सहभागींना सामील करण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत आहे. (प्रतिमा: PTI) -
अग्निवीरचे सदस्य आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी नवी दिल्लीत धुक्यात असलेल्या पहाटेच्या रंगीत तालीममध्ये करताना… (प्रतिमा: रॉयटर्स)
-
गुरुवारी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे बीएसएफ महिला डेअर डेव्हिल्स संघ सीमा भवानी यांनी प्रजासत्ताक दिन पथसंचलन २०२४ च्या तालीम दरम्यान कौशल्य सादर करत आहे. (प्रतिमा: PTI)
-
कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड २०२४ च्या तालीम दरम्यान सराव करणारे लोक कलाकार. (प्रतिमा: PTI)
-
प्रजासत्ताक दिन परेड २०२४ च्या सरावादरम्यान मद्रास रेजिमेंटच्या तुकडीद्वारे पथसंचलन करणाचा एक क्षण (प्रतिमा: PTI)
-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची पिनाक क्षेपणास्त्र प्रणाली प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या सरावा दरम्यान प्रदर्शन करताना. (प्रतिमा: PTI)
-
कर्तव्यपथावर आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तालीम करताना एनसीसी कॅडेट. (प्रतिमा: PTI)
-
कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान सशस्त्र दलाचे कर्मचारी. (प्रतिमा: PTI)
-
कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) च्या महिला कर्मचारी. (प्रतिमा: PTI)
-
कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन परेड२०२४ च्या रंगीत तालीम दरम्यान CRPF च्या ‘डेअरडेव्हिल्स’ची सर्व महिला टीम. (प्रतिमा: PTI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”