-
श्री राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्राण प्रतिष्ठा’ विधी पार पडणार आहे. अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे या सोहळ्यानिमित्त सुरु असलेल्या तयारीचे काही खास फोटो पाहू…
-
राम मंदिराला अभिषेक सोहळ्यापूर्वी रंगीबेरंगी फुलांनी सजवले जात आहे. (पीटीआय फोटो)
-
तसेच संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (पीटीआय फोटो/अरुण शर्मा)
-
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. (रॉयटर्स/अदनान अबिदी)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्राण प्रतिष्ठा’ विधी पार पडणार आहेत. ते येथे चार तास थांबतील.(पीटीआय फोटो)
-
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील विविध काम पूर्ण करण्यासाठी कामगारांची धावपळ सुरु आहे. (पीटीआय फोटो/कमल किशोर)
-
याशिवाय राममंदिराच्या आतील सजावटीसह बाहेरूनही आकर्षक फुलांची आणि लखलखत्या दिव्यांची सजावट केली जात आहे. (पीटीआय फोटो/अरुण शर्मा)
-
अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. सुरक्षेसाठी २० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो/कमल किशोर)
-
अयोध्येत राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत. (पीटीआय फोटो/नंद कुमार)
-
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘राज सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (पीटीआय फोटो/कमल किशोर)
-
शरयू नदीच्या काठावर भाविकासाठी बांधलेल्या टेंट सिटीमध्ये एक भाविक भगवान हनुमानाचा पोशाख घालून नृत्य करत होता. (रॉयटर्स)
-
तसेच या परिसरातील लता मंगेशकर चौकात काही भाविक एका कलाकाराबरोबर सेल्फी घेताना दिसते. (पीटीआय फोटो/कमल किशोर)
-
आजपासून पुढील तीन दिवस अयोध्येत बाहेरील नागरिकांना अयोध्येत प्रवेश नाकारण्यात आला आहे (पीटीआय फोटो/कमल किशोर)
-
या सोहळ्यानिमित्त एक वाळू शिल्पकाराने श्री रामावर आधारित सुंदर वाळू शिल्प साकरले आहे. (पीटीआय फोटो/विजय वर्मा)
-
यासह सुरत येथील गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अयोध्येच्या राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बसून प्रभु श्री रामाचा धनुष्यबाण तयार केला होता. (पीटीआय फोटो)
-
या खास सोहळ्यानिमित्त अनेक कामगार लाडू तयार करण्यात व्यस्त असल्याचे दिसतेय. (पीटीआय फोटो/कमल किशोर)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल