-
आज म्हणजे २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.
-
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या सोहळ्यासाठी जगातील अनेक देशांकडून विशेष भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत. राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी खास अफगाणिस्तानातून भेट म्हणून पाणी आले आहे.
-
अफगाणिस्तानच्या कुभा (काबुल) नदीचे पाणी अयोध्येतील राम मंदिरासाठी भेट म्हणून पाठवण्यात आले आहे.
-
राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील देश नेपाळमधूनही दागिने आणि कपड्यांसह 3,000 हून अधिक भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर हे प्रभू रामाची पत्नी सीतेचे जन्मस्थान मानले जाते.
-
नेपाळमधून आणलेल्या भेटवस्तूंमध्ये स्मरणिका सोन्या-चांदीच्या वस्तू, फर्निचर, कपडे, फळे, सौंदर्यप्रसाधने आणि अनेक स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे.
-
श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना जनकपूरमधील जानकी मंदिराचे महंत राम रोशन दास यांच्या हस्ते एक सुंदर सुशोभित स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
-
श्रीलंकेच्या शिष्टमंडळाने अशोक वाटिकेशी संबंधित एक दगड भेट म्हणून दिला आहे. सीतेचे रावणाने अपहरण केले तेव्हा तिला अशोक वाटिकेत नजरकैदेत ठेवले होते.
-
अमेरिकेतही अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत प्रचंड उत्साह आहे. रस्त्यांवर रामाचे फोटो असलेले मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल