-
PM Modi At Ram Temple : अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा झाली आहे. ज्या ऐतिहासिक क्षणाची वर्षानुवर्षे वाट पाहिली जात होती त्या क्षणाचे आपण सर्वांनी साक्षीदार झालो. राम लल्लाची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. (फोटो – सोशल मीडिया)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिरात प्रभु रामाची पूर्ण भक्तिभावाने पुजा केली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त पंतप्रधान मोदींनी पारंपारिक भारतीय कपडे परिधान केले होते ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठेची पूजा करण्यात आली. दरम्यान, पीएम मोदींच्या पारंपारिक लूकची चर्चा होत आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
धोती-कुर्त्यामध्ये पंतप्रधान मोदींचे भक्तीमय रुप पाहायला मिळाले. त्याने बदामी रंगाचे धोतर आणि पिस्ता कलरचा कुर्ता परिधान होता. त्याने कुर्त्यावर पेस्टल रंगाची सोनेरी कोटीही परिधान केला होता. हा पारंपारिक लुक परिपूर्ण करण्यासाठी त्याने गळ्यात हलका पांढरा रंगांची शेला घेतला होता. (एक्स्प्रेस फोटो)
-
पीएम मोदींनी हातात चांदीची छत्री घेऊन राम मंदिरात केला प्रवेश (एक्स्प्रेस फोटो)
-
पंतप्रधानांनी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची पूजा केली. दरम्यान, त्यांच्यासोबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. (फोटो – सोशल मीडिया)
-
पंतप्रधान मोदींनी कपाळावर टिळक लावले. हातात काळा दोरा बांधलेला होता. लोक पीएम मोदींच्या कपड्यांचे कौतुक करत आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर राम लल्लानी यांना दंडवत प्रणाम केला. ज्यातून त्यांची रामावरील भक्ती दिसून येते.
पीएम मोदींचा राम लल्लाला नतमस्तक करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.
(फोटो – सोशल मीडिया) -
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. दरम्यान, पीएमओने हेलिकॉप्टरमधून काढलेला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएम मोदी गेल्या काही दिवसांपासून फक्त नारळ पाणी पीत होते.
(फोटो – सोशल मीडिया) -
अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र गेल्या आठवडाभरापासून रामायणाशी संबंधित दक्षिण भारतातील विविध मंदिरांना भेट देत होते. येथे त्यांनी विविध मंदिरात पूजा केली. (फोटो – @narendramodi)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठे’निमित्त दिल्लीतील या निवासस्थानी ‘राम ज्योती’ लावतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो – एनआय)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ