-
‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे.
-
यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आहेत.
-
या फोटोला उद्धव ठाकरे यांनी ‘आपले प्रेम आणि आशीर्वाद हिच आमची ताकद…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर या फॅमिली फोटोची चर्चा सुरू आहे.
-
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी ट्विट करुन आदरांजली अर्पण केली आहे.
-
अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर सोमवारी (२२ जानेवारी) संध्याकाळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पंचवटीच्या काळाराम मंदिरात सहकुटुंब पूजा केली.
-
दुपारी शहरात आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी भगूर येथे सावरकर स्मारकास भेट दिली.
-
दरम्यान, आज, मंगळवारी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबिर होणार आहे.
-
संध्याकाळी जाहीर सभेतून ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उद्धव ठाकरे आणि शिवसेना/इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं