-
कोल्हापूर म्हंटल की, तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला नक्कीच आठवते. कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक याची चव चाखल्याशिवाय राहत नाही.
-
तसेच याबरोबरच कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्राचे एक महत्वाचे ठिकाण आहे. तर आज आपण कोल्हापूरातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊ.
-
श्री अंबाबाई मंदिर, कोल्हापूर : कोल्हापूरात आलेला प्रत्येक पर्यटक श्री अंबाबाई यांच्या चरणी नस्तमस्तक होतो. तसेच या प्रसिद्ध मंदिरात तुम्हाला मंदिराचे नक्षीकाम, रचना, स्तंभाची कलाकृती आदी अद्भुत कलेचा नजारा पाहता येईल.
-
दख्खनचा राजा (ज्योतीबा मंदिर) : कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर जोतिबाचे मंदिर आहे.
-
किल्ले पन्हाळगड : पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. इथे धान्य कोठार, धर्मकोठी, तबक उद्यान, तीन दरवाजा, अंबरखाना या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतील.
-
न्यू पॅलेस म्युझियम : न्यू पॅलेस म्युझियम छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. राजवाड्याच्या तळमजल्यावर तुम्हाला शादी जीवनाच्या विविध वस्तू पाहायला मिळतील.
-
रंकाळा तलाव : रंकाळा तलावात संध्याकाळच्या वेळी पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी असते. इथे तुम्ही बोटिंगचा अनुभव सुद्धा घेऊ शकता आणि लहान मुलांना खेळासाठी गार्डन सुद्धा बांधण्यात आले आहे.
-
श्री श्रेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कणेरी मठ, कोल्हापूर: इथे एक प्राचीन शिव मंदिर आहे. तसेच मेण व सिमेंट शिल्पांच्या मदतीने ग्रामीण जीवन चित्रीत केले आहे ; जे पाहण्यासारखे आहेत. (सर्व फोटो : लोकसत्ता )

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार