-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारी २०२४ ला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरला
-
यंदा सुद्धा निर्मला सीतारमण यांच्या साडीची विशेष चर्चा आहे. मागील पाच अर्थसंकल्पांमधील सीतारमण यांच्या साड्यांविषयी तसेच त्यांच्या रंगांमागील अर्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
-
२०१९ मध्ये भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगलगिरी गुलाबी साडी नेसून अर्थसंकल्प सादर केला होता. गुलाबी रंग हा स्थैर्य व सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.
-
२०२० मध्ये निर्मला सीतारमण यांनी तेजस्वी पिवळी सिल्क साडी नेसून अर्थसंकल्प सादर केला होता, पिवळा रंग हा उत्साह व ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.
-
२०२१ मधील निर्मला सीतारमण यांची पोचमपल्ली साडी लाल रंगाची होती व त्याला क्रीम रंगाचा काठ होता. लाल रंग हा वर्षानुवर्षे शक्ती व संकल्पाचा रंग मानला गेला आहे. तसेच या रंगाला गांभीर्याची झालर आहे असेही म्हटले जाते
-
२०२२ ला अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी ब्राऊन (तपकिरी) रंगाची बोमकाई साडी नेसली होती. हा मातीचा रंग असल्याने त्याला सर्वसमावेशक व व्यापक मानले जाते. तसेच हा सुरक्षेचा रंग म्हणून सुद्धा ओळखला जातो.
-
२०२३ या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल व काळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती जो शौर्य व शक्तीचे प्रतीक आहे. काळा रंग हा काहीसा बंडखोरीचा सुद्धा मानला जातो पण सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास बंधने मोडण्याची शक्ती असलेला हा रंग मानला जातो.
-
तर चालू वर्ष २०२४ मध्ये निर्मला सीतारमण यांनी निळ्या मोरपिशी रंगाची पानांच्या प्रिंटची साडी नेसली आहे. निळा रंग हा शांती, स्थैर्य, प्रेरणा व ज्ञानाचा मानला जातो.
-
२०२४ मध्ये अर्थसंकल्पासाठी सीतारमण यांनी नेसलेल्या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुतीच्या सिल्कमधील बंगाल कांथा साडीचा रंग तामिळनाडूमध्ये रामर (श्री राम) निळा म्हणून ओळखला जातो.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…