-
भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे.
-
भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासासाठी सर्वाधिक रेल्वेचा वापर होतो.
-
रेल्वे हे केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये कनेक्टिव्हिटीचे सर्वोत्तम साधन आहे.
-
एका दिवसात लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केलाच असेल.
-
रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी मानला जातो.
-
भारतीय रेल्वे जगभरात प्रसिध्द आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.
-
अनेकांचे आयुष्य रेल्वेशी निगडीत आहे. याद्वारे लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि संपूर्ण देशात प्रवास करू शकतात. सहसा प्रत्येक शहरात एक रेल्वे स्थानक असते.
-
आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा रेल्वेच्या एका स्थानकावर उतरतो, त्या स्थानकाला एक ठराविक नाव दिलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला त्या स्थानकाची ओळख पटवताना मदत मिळते.
-
पण तुम्हाला माहिती आहे का की, महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे. जेथे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्थानके आहेत आणि ज्याला वेगळी नावं देखील दिली आहेत.
-
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि बेलापूर स्थानके एकाच ठिकाणी असून ते ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहेत.
-
महाराष्ट्रातील अहमदनगरमधील हे स्टेशन खूप प्रसिद्ध आहे. येथे तिकीट खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही प्रवाशाला ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक असते.
-
बेलापूर आणि श्रीरामपूर शहरापासून ५ किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. हे औरंगाबाद, शिर्डी आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनशी जोडले गेले आहेत. (फोटो सौजन्य : indian express)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही