-
एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम पंजाबमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)
-
पंजाबमध्ये संयुक्त शेतकरी मोर्चाने महामार्ग रोखला आहे. त्याचवेळी राजधानी दिल्लीत भारत बंदमुळे वाहनांची लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. (पीटीआय फोटो)
-
संयुक्त शेतकरी मोर्चानुसार, भारत बंद सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. (पीटीआय फोटो)
-
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी शेतकरी रेल्वे रुळांवर बसल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.(पीटीआय फोटो)
-
पंजाब आणि दिल्लीशिवाय हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमध्येही भारत बंदचा प्रभाव दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)
-
संयुक्त शेतकरी मोर्चा (गैर-राजकीय) या बॅनरखाली काही शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो मोर्चा’ची हाक दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
‘दिल्ली चलो मोर्चा’मुळे लोकांना जास्त त्रास होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)
-
शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चामुळे हरियाणातील सोनीपतच्या कुंडली सीमेवर कडक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
त्याचबरोबर हरियाणा आणि पंजाब सीमेवर म्हणजेच शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी तळ ठोकला आहे. (पीटीआय फोटो)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती