-
आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचा झाला आहे. देशात मोबाईलच्या वापरात खूप झपाट्याने वाढ झाली आहे.
-
स्मार्टफोनच्या वापराबाबत गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे अभ्यास समोर आले आहेत. काही अभ्यावरुन असं सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो.
-
तर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की, त्याच्या रेडिएशनमुळे माणसांसह पशु-पक्ष्यांना मोठा धोका आहे. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण मोबाईलवरुन बोलण्यानेही आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का..?
-
मोबाईलच्या वापरात डोळ्यांसोबतच बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानांचाही वापर होतो. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पण जगातील काही संशोधक फोनवरुन बोलण्यासाठी कोणत्या बाजुच्या कानाचा वापर करावा, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार, सामान्यतः लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. एका संशोधनानुसार, उजव्या कानाने फोनवरुन ऐकण्याने थेट मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकतो.
-
जेव्हा आपण फोनवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा, असेही संशोधनातून सांगण्यात आलं आहे.
-
तथापि, फोनवर बोलण्यासाठी डावा कान की उजवा कान वापरणे सुरक्षित आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.
-
फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा ते रक्त-मेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते.
-
ब्लड-ब्रेन बॅरियरला नुकसान पोहोचवतात. ब्लड-ब्रेन बॅरियरला सेफ्टी बॅरियर म्हणूनही ओळखले जाते. हे रक्तातील धोकादायक पदार्थांना मेंदूमध्ये जाण्यापासून रोखते. मात्र, फोनवर बोलताना कोणता कान वापरावा, हे या अभ्यासातून अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
-
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, सुमारे ८० टक्के लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते.
-
परंतु, फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
-
(फोटो सौजन्य : freepik)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा