-
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाचे लग्नाअगोदरचे कार्यक्रम पार पडणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून ३ मार्च २०२४ पर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. (Photo: ANI)
-
दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी जागतिक पातळीवरील नामवंत व्यक्तीही हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.
-
ET च्या रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी कोणकोणत्या जागतिक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे जाणून घेऊया.
-
ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंट सीईओ ब्रूस फ्लॅट (Photo: Reuters)
-
एक्सॉर सीईओ जॉन एल्कन (Photo: Reuters)
-
बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मरे ऑचिनक्लोस (Photo: Reuters)
-
ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन (Photo: Reuters)
-
बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान (Photo: Reuters)
-
Adnoc सीईओ सुलतान अहमद अल जाबेर (Photo: Reuters)
-
ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक (Photo: Reuters)
-
मॉर्गन स्टॅनले सीईओ टेड पिक (Photo: Reuters)
-
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Photo: Reuters)
-
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Photo: Reuters)
-
डिस्नेचे सीईओ बॉब इगर (Photo: Reuters)
-
अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण असल्याचे सांगण्यात येते. अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिकाचा सहभाग असतो. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)
-
राधिका ही भारतातील प्रसिद्ध उद्योगपती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)
-
राधिकाने डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून आपले पुढचे शिक्षण घेतले आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)
-
राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. अभ्यासाबरोबर तिला डान्सचीही आवड आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)
-
येथे देण्यात आलेली माहिती विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. (Photo: ANI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”