-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या गुजरात दौऱ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या दौऱ्यात मोदींनी देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. (PC : Narendra Modi/X)
-
मोदी यांनी आज राजकोटमध्ये गुजरातमधील पहिल्या एम्स रुग्गालयाचंही उद्गाटन करणार आहेत. (PC : Narendra Modi/X)
-
दरम्यान, मोदी यांनी द्वारका येथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. (PC : Narendra Modi/X)
-
मोदी यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन पाण्याखाली बुडालेल्या द्वारका नगरीचं दर्शन घेतलं. (PC : Narendra Modi/X)
-
मोदींनी भारताच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळाला भेटली दिली. हे प्राचीन शहर भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. पुराणांमधील दाव्यांनुसार येथेच भगवान श्रीकृष्ण वास्तव्यास होते. (PC : Narendra Modi/X)
-
द्वारका बेटावर भगवान श्रीकृष्णाचं घर होतं असं मानलं जातं. कृष्ण आणि त्याचा प्रिय मित्र सुदामा या दोघांची भेट याच ठिकाणी झाली होती. (PC : Narendra Modi/X)
-
या मंदिरात भवगान श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांच्या मूर्ती आहेत. पुराणांमध्ये म्हटलं आहे की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या द्वारका यात्रेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी या बेटाला भेट देणं आवश्यक असतं. (PC : Narendra Modi/X)
-
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी गुजरातल्या द्वारकेमध्ये ‘सुदर्शन सेतू’चं उद्घाटन केलं. हा भारतातला सर्वात लांब केबल ब्रिज आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ९७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ओखा आणि बेयट येथील द्वारका बेटांदरम्यान हा पूल बांधण्यात आला आहे. (PC : Narendra Modi/X)
-
जवळपास पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाच्या बांधकामासाठीचं भूमिपूजन केलं होतं. जुन्या आणि नवीन द्वारकेमधील महत्त्वाचा धागा म्हणून हा ब्रिज काम करेल, असं म्हटलं जात आहे. (PC : Narendra Modi/X)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”