-
अश्लील इशारे करत नाचाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रकाशझोतात आलेलं गौतमी पाटील हे नाव नंतर वारंवार चर्चेत राहिलं. प्रसिद्ध असूनही अलीकडेच तिचा घुंगरू नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचायच्या आधीच पडला. या सगळ्यात आता गौतमीच्या खऱ्या नावावरून एक वेगळी चर्चा सुरु झाली आहे.
-
सबसे कातील, गौतमी पाटील अशा घोषणांनी प्रसिद्ध असणाऱ्या गौतमीने अलीकडेच एका कार्यक्रमात चाहतीशी गप्पा मारताना आपलं नाव वेगळंच सांगितलं आहे
-
जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकमात गौतमी हिला देखील बोलावण्यात आलं होतं. तेव्हा गौतमी हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली.
-
गौतमीने या चिमुकल्या चाहतीला तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने नाव वैष्णवी आहे असं सांगितलं. यावर गौतमी म्हणाली, “माझं देखील जन्मनाव वैष्णवी असं आहे…”
-
हा खुलासा गौतमीने गप्पांच्या वेळी केला आहे त्याचा काही पुरावा दाखवलेला नाही पण आता या वैष्णवी नावावरून गौतमी पुन्हा चर्चेत आली असं म्हणायला हरकत नाही
-
गौतमीच्या नावावरून वाद होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता
-
“गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटीव नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता
-
गौतमीच्या वडिलांनी सुद्धा त्यावेळी गौतमी ही पाटीलच आहे आणि पाटीलच नाव लावणार अशी भूमिका मांडली होती
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”