-
देशात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत.
-
याचे कारण कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. यामुळेच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीची वाहने नेहमीच अव्वल स्थानावर असतात.
-
आता एकीकडे ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती वाढवत आहेत, तेच दुसरीकडे मारुती सुझुकी कंपनीने आपल्या एका कारच्या किमतीत कपात केली आहे.
-
त्यामुळे मारुतीची स्वस्त कार तुम्हाला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
-
आता प्रश्न पडतो की, ही कार नेमकी कोणती? मारुतीने आपल्या कोणत्या कारच्या किमतीत कपात केली आहे?
-
तर मारुती सुझुकीच्या या स्वस्त कारचं नाव Alto K10 आहे. मारुती सुझुकीने आपल्या परवडणाऱ्या हॅचबॅक Alto K10 च्या किमती बदलल्या आहेत.
-
कंपनीने त्याच्या काही व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. अल्टो K10 च्या किमतीतील बदलांवर एक नजर टाकूया.
-
Alto K10 श्रेणीतील VXi AGS आणि VXi+ AGS प्रकारांच्या किमती ५,००० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या प्रकारांच्या किमती आता अनुक्रमे ५.५६ लाख आणि ५.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहेत.
-
असं सांगण्यात येते की, ही कार पेट्रोलमध्ये २४ किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये ३५ किलोमीटर मायलेज देते. (फोटो सौजन्य : financialexpress )

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार