-
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जगभरात चर्चा आहे. जगभरातील अनेक बड्या व्यक्ती त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमासाठी जामनगर, गुजरात येथे पोहोचत आहेत. (@नीता अंबानी/एफबी)
-
देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत येणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या आयुष्याविषयी अनेकांना कुतूहल असते, आज आपण अंबानी कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. (@नीता अंबानी/एफबी)
-
मुकेश अंबानी
मुकेश अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यानंतर एमबीए शिकण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र आपलं शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मुंबईला परतले. (इंडियन एक्सप्रेस) -
नीता अंबानी
नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मूंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी भरतनाट्यमचे सुद्धा रीतसर प्रशिक्षण घेतले आहे (@नीता अंबानी/एफबी) -
आकाश अंबानी
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याने मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. व पुढे ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात बॅचलरची पदवी मिळवली आहे. (@akashambanii/Insta) -
श्लोका मेहता
आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने धीरूभाई अंबानी स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण आकाशच्या बरोबरच पूर्ण केले. यानंतर, श्लोका लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली जिथे तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. (@shloka_akash_ambani/Insta) -
ईशा अंबानी
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचे सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. यानंतर ती अमेरिकेला गेली जिथे तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली. याशिवाय तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएही केले आहे. (इंडियन एक्सप्रेस) -
अनंत अंबानी
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले. त्यानंतर अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. सध्या रिलायन्स एनर्जीची जबाबदारी अनंत यांच्या खांद्यावर आहे. (@नीता अंबानी/एफबी) -
राधिका मर्चंट
राधिका मर्चंटने मुंबईच्या जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे. (@नीता अंबानी/एफबी)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…